Advertisement

तीन कारखान्यांवर बोजा चढविण्यासाठी लेखा परीक्षकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

प्रजापत्र | Wednesday, 17/03/2021
बातमी शेअर करा

 बीड- दि.(प्रतिनिधी)जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यांवरील कर्जाचा डोंगर कमी व्हायला तयार नसून जिल्ह्यातील तीन सहकारी साखर कारखान्यांकडे शासनाची कोट्यवधीची थकबाकी असल्याने त्यांच्या मालमत्तेवर बोजा चढवावा यासाठी विशेष लेखापरीक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे.

 

     बीड जिल्ह्यातील सहकारी साखर कारखानदारीची अवस्था मागच्या काही वर्षात बिकट झालेली आहे. काही कारखान्यांचा राज्य सहकारी बँकेने लिलावाची प्रक्रिया सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर बीडच्या विशेष लेखापरीक्षकांनी साखर कारखान्यांकडे असलेल्या शासनाच्या थकबाकीचा बोजा कारखान्याच्या मालमत्तेवर घ्यावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे दार ठोठावले आहे.

 

   बीड जिल्ह्यातील विखे पाटील सहकारी साखर कारखाना केज (२९.२९ कोटी), गजानन सहकारी साखर कारखाना राजुरी (२५.६२ कोटी) आणि जयभवानी सहकारी साखर कारखाना गढी (४.५९ कोटी) अशी शासकीय थकबाकी असलेले कारखाने असून  यांच्या मालमत्तेवर बोजा चढवावा अशी विनंती विशेष लेखापरीक्षकांनी बीडच्या जिल्हाधिकार्‍यांना केली आहे. या संदर्भात अगोदर तहसीलदारांना विनंती करण्यात आली.मात्र तहसीलदारांनी त्याला प्रतिसाद दिला नसल्याचे विशेष  लेखापरीक्षकांनी म्हटले आहे.

Advertisement

Advertisement