बीड : बीड जिल्ह्याच्या कोरोना मृत्यू दर ४ टक्क्यापेक्षाही अधिक झाला असून मृत्यूचे हे तांडव बुधवारी देखील थांबलेले नाही. बुधवारी गेवराई तालुक्यातील दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मयत रुग्ण गेवराई शहरातील गजानन नगर आणि तालुक्यातील बाग पिंपळगाव येथील रहिवाशी होते. या दोन मृत्यूंमुळे बीड जिल्ह्यातील कोरोनाबाळींची संख्या प्रशासकीय आकड्यानुसार १७ तर जिल्ह्यात झालेले आणि जिल्ह्याबाहेरील मृत्यू गृहीत धरले तर २१ झाली आहे.
बातमी शेअर करा