बीड-कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील बार,हॉटेल,टपऱ्या आदी संपूर्णतः बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी घेतला आहे. हॉटेलमधून पार्सलची सुविधा मात्र कायम ठेवण्यात आली आहे. तर सायंकाळी ७ ते सकाळी ७ या वेळेत सर्व आस्थापना बंद ठेण्यात येणार आहेत.
जिल्ह्यातील वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने निर्बंध अधिक कडक करणे सुरु केले आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील हॉटेल,बार,पान टपरी आदी गोष्टी आता ग्राहकांसाठी बंद राहतील. मात्र हॉटेलमधून पार्सल नेता येईल.
किराणा दुकान, दूध,औषधालय आदी जीवनावश्यक वस्तू वगळता इतर आस्थापना सायंकाळी ७ ते सकाळी ७ या वेळेत बंद ठेण्याचे आदेश देखील जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिले आहेत.
बातमी शेअर करा