बीड : येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजपाला मोठा धक्का बसला असून बँकेचे विद्यमान अध्यक्ष आदित्य सारडा यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. सारडा यांनी बँक पतसंस्था मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आदित्य सारडा यांच्या माघारीमुळे मागील कित्येक वर्षात पहिल्यांदाच सारडा कुटूंबापैकी कोणीच जिल्हा बँकेत नसेल.
बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी माघारी घेण्याचा बुधवारी शेवटचा दिवस होता. बुधवारी दुपारी नागरी बँका आणि पतसंस्था मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलेले बँकेचे विद्यमान अध्यक्ष आदित्य सारडा यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. या मतदारसंघावर अनेक वर्षांपासून सुभाष सारडा यांचा प्रभाव राहीलेला आहे. सुभाष सारडा जिल्हा बँकेवर असताना याच मतदारसंघातून निवडून यायचे.तर आदित्य सारडा हे देखील मागील निवडणुकीत याच मतदारसंघातून निवडून आले होते. भरवशाच्या मानल्या जाणार्या या मतदारसंघातून आदित्य सारडा यांनी माघार घेण्याचे नेमके कारण काय याच्या चर्चा आता सुरू झाल्या आहेत. भाजपाच्या गटाला सारडा यांची माघार हा मोठा धक्का आहे.
बातमी शेअर करा