Advertisement

'त्या ' उमेदवारांना दिलासा नाहीच

प्रजापत्र | Monday, 08/03/2021
बातमी शेअर करा

 सहनिबंधकांनीही फेटाळले अर्ज 
लातूर : बीड जिल्हा मध्यवर्ती  सहकारी बँकेच्या निवडणुकीत सेवा संस्था मतदारसंघातून अर्ज दाखल केलेल्या आणि लेखापरीक्षणाच्या निकषामुळे उमेदवारी बाद ठरविलेल्या 'त्या ' इच्छुकांचे चे अर्ज लातूरच्या विभागीय सह निब्बाणधकांनी देखील फेटाळले आहेत . त्यामुळे जिल्हा बँकेची निवडणूक लढविण्याचे अनेकांचे स्वप्न  भंगले आहे . 
बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक सुरु आहे. यात सेवा संस्था मतदारसंघातील ११ जागांसाठी तब्बल ७८ व्यक्तींचे  दाखल झाले होते , मात्र लेखा परीक्षणाच्या नियमांमुळे यातील एकही अर्ज पात्र ठरला नाही. निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास देशमुख यांनी या ११ जागांवरील सर्व अर्ज बाद केल्यानंतर यातील अनेकांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या या निर्णयाला लातूरच्या विभागीय सह निबंधकांकडे आव्हान दिले होते. यावर शुक्रवारी सुनावणी पूर्ण झाली होती. मात्र सह निबंधकांनी यावरच निर्णय राखून ठेवला होता. सोमवारी दुपारी हे सर्व आक्षेप फेटाळत असल्याचा निर्णय सह निबंधकांनी जाहीर केला. यामुळे भाजपच्या गटाला मोठा धक्का बसला आहे. 
याच विषयात सहकार मंत्र्यांनी दिलेल्या आदेशाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली असून त्यावर थोड्याच वेळात सुनावणी आहे. 

 

Advertisement

Advertisement