बीड दि.26 - आमची मुलगी गेल्याचे दुःख तर आहेच. मात्र त्यापेक्षाही जास्त दुःख विनाकारण बदनामी केल्याने होत असून हे प्रकार जर नाही थांबले तर आम्हा सर्वांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही अश्या वेदना पूजा चव्हाण च्या कुटुंबीयांनी माध्यमा समोर मांडल्या. तर राजकारणी व माध्यमांनी एका मुलीच्या वैयक्तिक आयुष्यावर सुरू केलेले हे प्रकार अतिशय क्लेशदायक असल्याची भावना कुटुंबियां समवेत पूजा चव्हाण च्या 15 वर्षीय बहिणीने व्यक्त केली.
पूजा चव्हाण चा मृत्यू होऊन 15 दिवस उलटून गेले आहेत. तेंव्हापासून आमच्या मुलीच्या मृत्यूचे राजकारण सुरू आहे. राजकारणासाठी तिच्या मृत्यूचे भांडवल करण्यात येत आहे. तिचे वैयक्तिक फोटो माध्यमातून दाखवण्यात येत आहेत. हा अधिकार कुणी दिला ? असा जळजळीत सवाल पूजा चव्हाण च्या बहिणीने व्यक्त केला. तर आई वडिलांनाही पोलीस तपासात जे निष्पन्न व्हायचे ते होईल, त्यांना त्यांचे काम करू द्या, मात्र आमची बदनामी थांबवा अशी आर्त विनवणी केली.
दरम्यान माझी बहिण वाघीण होती ती आत्महत्या करूच शकत नाही या गोष्टीवर आताही मी ठाम असून चौकशी झालीच पाहिजे. मात्र बदनामी थांबवा अन्यथा मलाही आत्महत्या करावी लागेल अशी भावनिक साद घातली.