Advertisement

कोरोना रुग्णांना जिल्ह्यातच उपचार उपलब्ध करुन द्या

प्रजापत्र | Thursday, 25/02/2021
बातमी शेअर करा

बीड राज्याच्या अनेक भागात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत असून मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, लातूर सारख्या जिल्ह्यातही कोरोना रुग्ण आढळल्याचे  प्रमाण वाढले आहे. याचवेळी अनेक जिल्ह्यातून रुग्ण उपचारासाठी औरंगाबादला येत असल्याने औरंगाबाद जिल्ह्याचा पाराभूत सुविधांवर ताण पडत असल्याचे सांगत कोरोना रुग्णांवर जिल्ह्यातच उपचाराची व्यवस्था करा, त्यांना औरंगाबादला येण्याची वेळ आणू नका असे फर्मान औरंगाबादचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी काढले आहे.
                  राज्याच्या सर्वच भागात सध्या कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यातून कोरोनावरील उपचारासाठी रुग्ण औरंगाबादला येतात, त्यामुळे आता औरंगाबाद जिल्ह्याच्रा पायाभूत सुविधांवर परिणाम होत असल्याचे विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी म्हटले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रुग्ण उपचारासाठी आल्याने येथील यंत्रणेवर ताण पडतो त्यामुळे कोरेाना बाधित रुग्णांवर त्या-त्या जिल्ह्यातच उपचार होतील हे पहावे असे निर्देश आयुक्त केंद्रेकर यांनी औरंगाबाद विभागातील सर्व जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत. जिल्हाधिकार्‍यांनी सर्व वैद्यकीय अधिकार्‍यांना आपल्या जिल्ह्यातील उपचारासंदर्भातील पायाभूत सुविधा वाढवाव्यात आणि जिल्ह्यातच उपचार होतील याची दक्षता घ्यावी अशा सूचना केल्या आहेत. 

Advertisement

Advertisement