बीड-जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली असून शुक्रवारी पाठविण्यात आलेल्या 292 स्वॅब पैकी 20 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.तांत्रिक कारणामुळे शनिवारी पहाटे हे अहवाल आरोग्य विभागाकडे प्राप्त झाले आहेत.पॉझिटिव्ह रुग्ण हे बीडमधील 8, परळी 4, गेवराई 6, आष्टी 1 धारूर 1 असे आहेत.
बीडमधील 8 रुग्णांमध्ये संत तुकाराम नगर (50 वर्षीय पुरुष), तुळजाई नगर (30 वर्षीय पुरुष), घुमरे कॉम्लेक्स (9वर्षीय पुरुष), परवाना नगर (55 व 32 वर्षीय महिला), अश्विनी लॉजजवळ असणाऱ्या शाहूनगरमध्ये (24 व 25 वर्षीय पुरुष), चौसाळा (ता.बीड 43 वर्षीय पुरुष) यांचा समावेश आहे.तर परळीच्या विद्या नगरमध्ये (62 वर्षीय महिला), नाथ्रामधील (46 वर्षीय पुरुष), सिद्धार्थ नगर (35वर्षीय महिला), गुरुकृपा नगर (वय-48 वर्षीय पुरुष) आढळून आले.
गेवराईत संजय नगर (25 वर्षीय पुरुष), इस्लामपूरा (38, 14, 22 वर्षीय महिला), मोमीनपुरा 47 व 60 वर्षीय पुरुष ) कोरोना पॉझिटिव्ह निघाले.तसेच आष्टीच्या दत्तमंदिर गल्ली येथे गुलबर्गावरून आलेला 44 वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाली असून धारूरच्या साठे नगर भागात 42 वर्षीय पुरुष देखील कोरोना पॉझिटिव्ह सापडला आहे.
दरम्यान शुक्रवारी जिल्ह्यातून 292 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.यामध्ये बीडमधून 112, आष्टी 15, माजलगाव 27, गेवराई 18, केज 14, परळी 66, अंबाजोगाईमधून 40 स्वॅब तपासणीसाठी गेले होते. यातील 20 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.