बीड-जिल्ह्यात वाढत्या लाखोरीवर एसीबीने कारवायांचा फास आवळाला असताना गेवराई एका हवालदाराने पाच हजार घेतले आणि एसीबीच्या टीमला बघताच कार घेऊन पैशांसह धूम ठोकल्याचा खबळजनक प्रकार समोर आला आहे. गेवराई पोलीस ठाण्यातच हा प्रकार घडल्याने आता पुन्हा एकदा हे ठाणे वादात सापडले आहे.
पांडुरंग उत्तम दराडे असे त्या हवालदाराचे नाव आहे. एसीबीचे डीवायएसपी सोपान चित्तमपल्ले यांनी दिलेल्या माहितीनुसार चोरीला गेलेल्या कारचा ताबा देण्यासाठी न्यायलयीन आणि कागदपत्री कुटाने टाकून कार फिर्यादीला देतो मात्र पाच हजार द्या अशी मागणी दराडेने केली होती. याची तक्रार एसीबीकडे प्राप्त झाल्यानंतर गेवराई पोलीस ठाण्यात सापळा रचण्यात आला. यावेळी दराडेने स्वतःच्या खाजगी कारमध्ये बसूनच फिर्यादीकडून पाच घेतले यावेळी पंच देखील समक्ष हजर होते. त्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांना इशारा देताच दराडेने पंच आणि फिर्यादीला कारच्या खाली उतरत धूम ठोकली. यावेळी त्याने पैसे देखील सोबत ठेवले होते. याप्रकारामुळे खळबळ उडाली असून बीड एसीबी पुढील तपास करीत आहे. गेवराईत किशोर पवार यांना नियंत्रण कक्षात संलग्न केल्यानंतर सुकाळे यांच्या कार्यकाळात पुन्हा एकदा ट्रॅपचा प्रकार समोर आल्यामुळे गेवराई ठाणे वादात सापडले आहे.

