Advertisement

पाडळशिंगीच्या टोल नाक्यावर दोन पोलिसांना वाहनाची धडक

प्रजापत्र | Sunday, 01/11/2026
बातमी शेअर करा

बीड-येथील राज्य महामार्गवरील पाडळशिंगीच्या टोल नाक्यावर दोन पोलिसांना एका विस्टा कारने धडक दिल्याची घटना शनिवारी (दि.३१) रात्री घडली आहे.वाहनाच्या धडकेत दोन कर्मचारी जखमी झाल्याने त्यांना सुरूवातीला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.प्राथमिक उपचारानंतर दोघांनाही एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.महामार्ग सुरक्षा पथकाच्या पोलीस अधिक्षक डॉ.रुपाली दरेकर यांनी रात्री घटनास्थळी आणि जखमी पोलिसांशी भेट देऊन प्रकृतीची विचारपूस केली. 

    कोळवाडी फाट्याजवळ चार अपघातात दोन ठार आणि सहा जखमी झाल्यानंतर पाडळशिंगीच्या टोल नाक्याजवळ सुद्धा एक अपघाताची घटना घडली होती.त्यामुळे महामार्ग पोलिसांनी रात्री घटनास्थळी धाव घेतली.यावेळी पोलीस कर्मचारी बाळकृष्ण म्हेत्रे आणि सचिन पवळ हे रात्री रस्त्यावर उभे असताना इंडिका विस्टा (एम.एच.२३ ए.डी.००१२) ला अडविण्याचा प्रयत्न केला.मात्र या कारने दोन्ही कर्मचाऱ्यांना धडक देऊन पळ काढला.या घटनेत दोघांनाही दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.प्राथमिक उपचारानंतर दोघांनाही खाजगी रुग्णालयात आणण्यात आले होते.दरम्यान घटनेची माहिती मिळताच महामार्ग सुरक्षा पथकाच्या पोलीस अधिक्षक डॉ.रुपाली दरेकर यांनी दवाखान्यात येत पोलीस कर्मचाऱ्यांशी संवाद साधत प्रकृतीची विचारपूस केली.यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी मुंडे,पोलीस उपनिरीक्षक बबन राठोड यांच्यासह संघर्ष गोरे व इतर कर्मचाऱ्यांशी उपस्थिती होती.पोलिसांचा जीवच जर सुरक्षित नसेल तर महामार्गावर सामान्यांचे काय?असा सवाल या घटनेमुळे उपस्थिती होत असून रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता अशी माहिती आहे.

 

Advertisement

Advertisement