Advertisement

धक्क्यावर धक्के, आणखी सहा पॉझिटिव्ह

प्रजापत्र | Thursday, 09/07/2020
बातमी शेअर करा

बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असून रुग्णांचे प्रमाण मागील आठवड्यांपासून कमी होण्याचे नाव घेत नाहीये. गुरुवारी बीड जिल्ह्यातून 258 स्वॅब तपासणीसाठी अंबाजोगाईच्या स्वराती मधील लॅबमध्ये पाठविण्यात आले होते. यातील  6 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये बीड शहरातील काळे गल्ली भागातील 1, गेवराईच्या उमापूर भागातील 1, परळीच्या एसबीआय शाखेचा एक कर्मचारी, धारुरच्या अशोकनगर भागातील एक महिला आणि अंबाजोगाईच्या देशपांडे गल्लीतील एक फिरता व्यवसायीक व सातपुते गल्लीतील एका पुरुषाचा समावेश आहे. सध्या बीड जिल्ह्यात 199 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आले असून 123 व्यक्ती उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत. आज घडीला जिल्ह्यातील 70 व्यक्तींवर उपचार सुरु असून तर 7 जणांचा मृत्यु झाला आहे.
बीड जिल्हा रुग्णालयात गुरुवारी संभाव्य कोरोना रुग्ण म्हणून स्वॅब घेतलेल्या दोघांचा मृत्यु झाला होता. मात्र या दोघांचेही कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यातील एका व्यक्तीला डेंग्यू झालेला होता तर दुसर्‍याला निमोनियाची तक्रार होती. या दोघांचेही अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर आरोग्य प्रशासनाने सुटकेचा निश्‍वास सोडला आहे.

 

Advertisement

Advertisement