पाटोदा : काहीही झाले तरी मी हटणार नाही , मी मुंबईला जाणार आहे, उद्या दुपारी १ वाजता मी मुंबईला निघणार आहे, समाजाने कधी यायचे ते मी शासनाचा एक मसुदा आला आहे तो पाहिल्यावर सांगणार आहे असे म्हणत मनोज जरांगे यांनी आपल्या मुंबई आंदोलनाची दिशा स्पष्ट केली आहे.
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच केली असून मंगळवारी रात्री उशिरा त्यांनी पाटोदा येथे मुक्काम केला. त्यानंतर त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. त्यामुळे नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज यांनी मनोज जरांगे यांना विनंती केल्याने त्यांनी सलाईन घेण्यास सुरुवात केली. बुधवारी दिवसभर त्यांच्यावर पाटोदा येथील मुक्कामाच्या ठिकाणी उपचार सुरु होते. त्यामुळे जरांगे यांचे आंदोलन नेमके कसे होणार याची सर्वांना उत्सुकता होती. त्यावर आपली भूमिका स्पष्ट करताना मनोज जरांगे यांनी 'आपण मुंबईला जाणारच आहोत, कोण अडवते ते पाहतो. आपण समाजाला देखील कधी यायचे ते सांगणार होतो, मात्र आता ते आपण काही वेळाने सांगणार आहोत, मात्र मी जाणार हे नक्की. ' असे मनोज जरंगे यांनी स्पष्ट केले. पोलिसांनी मनोज जरांगे यांना आंदोलनाची स्पष्ट माहिती विचारल्यावरून देखील मनोज जरांगे यांनी पोलिसांवर टीका केली.

बातमी शेअर करा
