Advertisement

मंडळ अधिकारी लाचेच्या जाळ्यात

प्रजापत्र | Friday, 04/09/2026
बातमी शेअर करा

बीड-शेतीचा फेरफार नोंद करून देण्यासाठी एक लाखाच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी मंडळाधिकाऱ्याला बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.आरोपीला संशय आल्याने त्याने पैसे स्वीकारले नाही मात्र लाचेची मागणी केल्याप्रकरणी त्याला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे.
   बीड जिल्ह्यात लाचखोरांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून महसूल विभागातील मोठे मासे देखील एसीबीच्या गळाला लागत असल्याचे चित्र आहे.तक्रारदाराकडे जमिनीच्या फेरफारची नोंद करून देण्यासाठी लाखाची लाच मागण्यात आली.त्यावरून एसीबीने खात्री केल्यानंतर शुक्रवारी सापळा रचण्यात आला.मात्र सतीश विठ्ठलराव भुसेवाड (वय-४१,रा.बानाई नगर,पोखरी रोड) या मंडळअधिकाऱ्याला कारवाईचा संशय आल्याने त्याने पैसे स्वीकारले नाही.मात्र लाचेची मागणी केल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.सध्या बीडच्या एसीबीने आरोपीला ताब्यात घेतले असून त्याला बीडकडे घेऊन येत असल्याची माहिती आहे.एसीबीचे उपाधीक्षक सोपान चित्तमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाईचे करण्यात आली आहे.   

Advertisement

Advertisement