Advertisement

गावठी कट्टा बाळगणाऱ्या तरुणाला ठोकल्या बेड्या

प्रजापत्र | Friday, 04/09/2026
बातमी शेअर करा

बीड दि.४(प्रतिनिधी): शहरातील जालना रोडवर लोड केलेले गावठी पिस्टल घेऊन फिरणाऱ्या एका तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवार (दि.३)रोजी ताब्यात घेतले आहे.आरोपीविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून,पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे.

   बीड शहरातील जालना रोड परिसरात एक तरुण लोड केलेले पिस्टल घेऊन फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली.माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून संशयित तरुणाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे एक गावठी पिस्टल,चार जिवंत काडतूस आढळून आले.आरोपीने आपले नाव सत्यम अशोक कासार असे सांगितले.त्याने पिस्टल कोठून आणले, ते बाळगण्या मागील उद्देश काय होता आणि तो नेमका कुठे जाणार होता, याबाबत पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे.सदरील आरोपीविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरील कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वेंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि शिवाजी बंटेवाड, एपीआय धनराज जारवाल, पो.ह. दीपक खांडेकर, गोविंद राख, भागवत शेलार, आनंद मस्के यांनी केली.

 

Advertisement

Advertisement