Advertisement

तलावात विद्युत प्रवाह उतरल्याने तरुणाचा मृत्यु !

प्रजापत्र | Tuesday, 01/09/2026
बातमी शेअर करा

परळी दि.१(प्रतिनिधी): तालुक्यातील मिरवट येथिल एक तरुण सोमवार (दि. ३१)रोजी मासे पकडण्यासाठी गेला असता तलावात विद्युत प्रवाह उतरलेला असताना हा पाण्यात उतरताच करंट लागून त्याचा मृत्यु झाल्याचा दावा केला जात आहे.
  परळी तालुक्यातील मिरवट येथिल दादामिया अलाउद्दीन शेख (वय १९) हा तरुण मासे पकडण्यासाठी मिरवट येथील तलावावर गेला होता. दरम्यान त्याला विद्युत शॉक लागून मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर तो पाण्यात उतरताच करंट लागून तो कोसळला हा प्रकार लक्षात येताच ग्रामस्थांनी त्यास पाण्यातून बाहेर काढून उपचारासाठी परळी येथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र येथे डॉक्टरांनी तपासणी करुन त्याचा मृत्यु झाल्याचं घोषित केले. 

Advertisement

Advertisement