Advertisement

कारची दुचाकीला धडक;दोघे जखमी

प्रजापत्र | Tuesday, 01/09/2026
बातमी शेअर करा

बीड दि.१(प्रतिनिधी): शहरातील व्हीआयपी लॉन्स जवळ कार-दुचाकीची धडक होऊन घडलेल्या अपघातात दुचाकीवरील दोघे जखमी झाले असून यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. 
   बीड शहरातील व्हीआयपी लॉन्स जवळ कार-दुचाकीचा मंगळवारी (दि.१) रोजी दुपारी १२ च्या सुमारास अपघात झाला असून स्विफ्ट डीझायर क्र.एमएच. १२ ईटी २५९९ तेलगाव येथून बीडकडे येत होती.या दरम्यान ती कार शहरातील व्हीआयपी लॉन्स जवळ आली असता तेथेच यू टर्न घेत असलेल्या दुचाकीला या कारची धडक लागली यात दुचाकीवरील दोघे जखमी झाले आहेत. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. मात्र या दोन्ही जखमींची नावे समजू शकली नाहीत.तसेच दुचाकी विना क्रमांकाची असल्याचे सांगितले जात आहे. पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत.

 

Advertisement

Advertisement