Advertisement

सोळा वर्षीय मुलीवर धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार

प्रजापत्र | Monday, 31/08/2026
बातमी शेअर करा

  दिल्ली :  एका १६ वर्षीय मुलीवर ड्रायव्हर आणि कंडक्टरने (क्लिनर) धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार केल्याची घटना दिल्ली येथे घडली आहे. सदर घटना ४ ऑगस्टच्या रात्री कश्मीरी गेट परिसरात घडली. या प्रकरणात पोलिसांनी बस चालक कुलदीप आणि कंडक्टर संदीप यांना अटक केली आहे. पीडित विद्यार्थिनी उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

    अधिक माहितीनुसार, विद्यार्थिनी कुटुंबीयांवर नाराज होऊन कोणालाही न सांगता घराबाहेर पडली होती. नोएडामध्ये राहणाऱ्या तिच्या चुलत भावाकडे ती जात होती. मात्र, मुसळधार पाऊस आणि अंधारामुळे ती चुकून ग्रेटर नोएडातील परी चौक येथे उतरली. याचदरम्यान एक रिकामी स्लीपर बस तेथून जात होती. विद्यार्थिनीने बस थांबवण्यासाठी हात केला. त्यानंतर चालक आणि कंडक्टरने बस थांबवून तिला नोएडा सेक्टर-६३ येथे जाण्याचे सांगत बसमध्ये बसवले. बस सुरू झाल्यानंतर काही वेळातच कंडक्टरने पीडित विद्यार्थिनीशी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. पीडितेच्या म्हणण्यानुसार, त्यानंतर चालक आणि कंडक्टरने तिच्यावर बलात्कार केला. विरोध केल्यास जीवे मारण्याची धमकीही दिल्याचा आरोप आहे. यानंतर आरोपींनी रात्री उशिरा कश्मीरी गेट बस अड्ड्याजवळील रिंग रोडवर विद्यार्थिनीला उतरवून तिथून फरार झाले.परी चौक ते कश्मीरी गेट या सुमारे ४७ किलोमीटरच्या प्रवासादरम्यान दोन आरोपींनी विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. घाबरलेल्या विद्यार्थिनीने कश्मीरी गेट पोलिसांशी संपर्क साधून संपूर्ण घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तिमारपूर येथील एका बस पार्किंगमधून दोन्ही आरोपींना अटक केली. घटनेत वापरलेली स्लीपर बस पोलिसांनी ताब्यात घेतली असून तिची फॉरेन्सिक तपासणी करण्यात येत आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, बसमध्ये बिघाड झाल्यानंतर आरोपी बसला दुरुस्तीसाठी सूरजपूर येथील वर्कशॉपमध्ये घेऊन गेले होते. बसची दुरुस्ती झाल्यानंतर चालक आणि कंडक्टर रिकामी बस घेऊन तिमारपूरच्या दिशेने जात होते.

Advertisement

Advertisement