शिरूर कासार दि.२८(प्रतिनिधी):शहरातील बाजारतळ परिसरात लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा लंपास केल्याची घटना सोमवार (दि.२४) रोजी रात्री घडली असून चोरट्यांविरुद्ध शिरूर कासार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरूर कासार तालुक्यात चोरी,घरफोडी अश्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत असून याकडे पोलिसांचे साफ दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.ज्ञानेश्वर प्रभाकर रोकडे (वय ४५) रा.भालगाव फाटा ता.पाथर्डी जि.अहमदनगर यांची शिरूर शहरातील बाजारातळात लावलेली हिरो फॅशन प्लस कंपनीची दुचाकी क्र.एमएच. १६ एके ५४९६ हिचे अज्ञात चोरट्यांनी हॅण्डल लॉक तोडून सोमवार (दि.२४) रोजी भरदिवसा लंपास केली असून अंदाजे १५,००० रुपयांचे नुकसान झाल्या प्रकरणी ज्ञानेश्वर रोकडे यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुरुवार (दि.२७) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास श्री.सुरवसे हे करत आहेत.

बातमी शेअर करा
