Advertisement

मध्यरात्री चोरट्यांनी शेकऱ्याचे फोडले घर

प्रजापत्र | Friday, 28/08/2026
बातमी शेअर करा

 शिरुर कासार दि.२६(प्रतिनिधी):तालुक्यातील वडाळी येथील एका शेतकऱ्याचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण १,६१,५१० रुयांचा ऐवज लंपास केल्याची घटना मंगळवार (दि.२५) रोजी मध्यरात्री घडली असून याप्रकरणी शिरूर कासार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

    शिरुर कासार तालुक्यात मागील काही दिवसांपासून घरफोडीच्या घटना सातत्याने घडत असून याकडे पोलिसांचे साफ दुर्लक्ष असल्याचे दिसून येत असून वडाळी येथील एका शेतकरी ऋषीकेश दिनकर मुळे (वय २३) यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरटे घरात घुसले आणि घरातील कपाट फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण १,६१,५१० रुयांचा ऐवज लंपास केल्याची घटना मंगळवार (दि.२५) रोजी मध्यरात्री घडली असून याप्रकरणी शिरूर कासार पोलीस ठाण्यात गुरुवार (दि.२७) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा तपास पोउपनि श्री.जायभाये हे करीत आहेत.   

Advertisement

Advertisement