बीड दि.२८(प्रतिनिधी): माजलगाव तालुक्यातील निथरूड शिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक भारत पांढरे यांच्या पथकाने कारवाई केली असून या कारवाईत जुगार खेळणाऱ्या ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला एकूण १४ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,माजलगाव तालुक्यातील निथरूड येथील शिवारात काही इसम जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक भारत पांढरे यांना मिळाली.माहितीची खातरजमा करून गुरुवार (दि.२७) रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजता पथकाने संबंधित ठिकाणी कारवाई केली.यावेळी काही इसम जुगार खेळताना आढळून आले.पोलिसांनी त्यांच्याकडून ४,१०,००० रोख, अंदाजे ९ लाख किमतीची दोन चारचाकी वाहने तसेच १.३० लाख किमतीचे आठ मोबाईल फोन असा एकूण १४ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून या प्रकरणी दिंद्रुड पोलीस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.सदरील कारवाई पोलीस अधीक्षक बीड नवनीत कॉवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके आणि उपविभागीय पोलीस अधिकारी,माजलगाव अशोक अनंतरे,परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक भारत पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि महेश भोसले, अक्षय लोंढे,कृष्णा काकडे,सचिन गायकवाड,पांडुरंग मोटे, राजाभाऊ मोटे,कागणे तसेच इतर पोलीस अधिकारी व अंमलदार सहभागी होते.

