Advertisement

जुगार अड्ड्यावर कारवाई 

प्रजापत्र | Tuesday, 25/08/2026
बातमी शेअर करा

 बीड दि.२५(प्रतिनिधी) : बीड-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावरील देवकी हद्दीतील हॉटेल तुळजाई येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिस उपअधीक्षकांच्या पथकाने धडक कारवाई केली.यात ‘तिरट’ नावाचा जुगार खेळणाऱ्या १२ जणांवर कारवाई करण्यात आली असून ८ लाख ५९ हजार २६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
देवकी येथील हॉटेल तुळजाई येथे जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.माहितीच्या आधारे पोलिसांनी सदर ठिकाणी सोमवार (दि.२४)रोजी   सायंकाळी ६ वाजता कारवाई केली. यावेळी १२ जण तिरट नावाचा जुगार खेळताना आढळून आले.पोलिसांनी पंचनामा करून रोख रक्कम, मोबाईल फोन, मोटारसायकली तसेच जुगाराचे साहित्य असा एकूण ८,५९,२६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.सदरील कारवाई पोलीस अधीक्षक नवनित कॉवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक भारत पांढरे, पोलीस अंमलदार अविनाश सानप, अक्षय लोंढे, योगेश निर्धार तसेच क्यूआरटी टीमने केली.

Advertisement

Advertisement