Advertisement

गळफास लावून इसमाची आत्महत्या

प्रजापत्र | Monday, 24/08/2026
बातमी शेअर करा

 बीड दि.२४(प्रतिनिधी): एका ५२ वर्षीय इसमाने राहत्या घरातील लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना धानोरा रोडवरील गोविंदनगर भागात आज सकाळी उघडकीस आली.
बीड शहरातील धानोरा रोड,गोविंद नगर भागातील रहिवाशी बाबासाहेब मारूती गोकुळे (वय ५२) यांनी राहत्या घरातील पत्र्याच्या लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला.त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले.गोकुळे यांनी आत्महत्या का केली? याचे कारण मात्र समजू शकले नाही.

Advertisement

Advertisement