बीड दि.२१(प्रतिनिधी): अंबाजोगाई तालुक्यातील शेपवाडी येथील लक्ष्मीनारायण हॉटेलमध्ये छापा टाकून गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या १९ वर्षीय तरुणाला गुरुवार (दि.२०) रोजी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून एकूण ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक परळी रोड परिसरात पेट्रोलिंग करत असताना, लक्ष्मीनारायण हॉटेलमध्ये एक इसम कमरेला गावठी कट्टा लावून जेवण करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.पोलिसांनी हॉटेलमध्ये छापा टाकला असता शुभम भरत वाघमारे (वय १९) रा. नकलगाव, ता. माजलगाव, जि. बीड याच्याकडून गावठी कट्टा (पिस्टल) आणि दोन जिवंत काडतुसे असा एकूण ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीसह जप्त मुद्देमाल पुढील कारवाईसाठी अंबाजोगाई शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.सदरील कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत,अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख,उपविभागीय पोलीस अधिकारी वेंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. शिवाजी बंटेवाड,पोउनि.सुशांत सुतळे, रामचंद्र केकान, मारुती कांबळे, सचिन सानप, गोविंद भताने, सचिन आंधळे, विकी सुरवसे आणि अतुल हराळे यांनी केली.

बातमी शेअर करा
