Advertisement

वाळूची वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला

प्रजापत्र | Friday, 14/08/2026
बातमी शेअर करा

शिरूर कासार दि.१४(प्रतिनिधी) तालुक्यातील रुपूर फाट्यावर ट्रॅक्टरच्या साहाय्याने अवैध वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांनी मिळताच गुरुवार (दि.१३) रोजी कारवाई करत ९,०६,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून ट्रॅक्टर चालकाविरुद्ध शिरूर कासार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

   बीड जिल्हयात मागील काही दिवसांपासून अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांनी कारवाईचा सपाटा सुरु केला असून शिरूर कासार तालुक्यातील गोमळवाडा ते शिरूर रोडवर रुपूर फाट्यावर ट्रॅक्टरच्या साहाय्याने वाळूची वाहतूक करताना विष्णू शिवाजी बनकर (वय ३२) रा.गोमळवाडा ता.शिरूर कासार जि.बीड याच्यावर शिरूर कासार पोलिसांनी गुरुवार (दि.१३) रोजी ०३:०३ वाजता कारवाई केली.यात सोनालिका डीआय ७४५ कंपनीचा निळ्या रंगाचा ट्रॅक्टर अंदाजे किंमत ८,००,००० रुपये व एक  लोखंडी ट्रॉली अंदाजे किंमत १,००,००० रुपये व ट्रॉलीमध्ये अंदाजे एक ब्रास वाळू अंदाजे किंमत ६,००० रुपये असा एकूण ९,०६,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास पोह श्री.सोनवणे हे करत आहेत.

Advertisement

Advertisement