Advertisement

शेततळ्यात बुडून महिलेचा लिंबागणेशमध्ये मृत्यु

प्रजापत्र | Thursday, 09/07/2020
बातमी शेअर करा

महारुद्र वाणी 
लिंबागणेश-पाणी आणण्यासाठी गेलेल्या उषा संदिप गिरे (वय-२९ रा.गिरेवस्ती लिंबागणेश) यांचा शेततळ्यात बुडून मृत्यु झाल्याची घटना गुरुवारी सकाळी समोर आली. 


                         बुधवार सायंकाळी ६ वा शेततळ्यावर पाणी आणण्यासाठी गेलेल्या उषा गिरे रात्री उशिरापर्यंत घरी न पोहचल्याने नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेणे सुरु केले.गावात त्या कोणाकडेच आल्या नसल्याचे समोर आल्यानंतर अखेर रात्री उशिरा शेततळ्यात त्यांचा मृतदेह आढळून आला.सकाळी ९ वाजता  उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह लिंबागणेश येथील  प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला होता.घटनास्थळी स.पो.नि. लक्ष्मण केंद्रे यांनी भेट दिली होती. उषा यांच्या पश्चात पती संदिप गिरे,सार्थक (वय-७) आणि संस्कार
(वय-४) असा परीवार असून त्यांचे माहेर गेवराई तालुक्यातील मौजे पिंपळा (कानडा) आहे.
 

Advertisement

Advertisement