Advertisement

ट्रकच्या धडकेत वारकऱ्यांचा मृत्यु !

प्रजापत्र | Monday, 13/07/2026
बातमी शेअर करा

पुणे  : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात राष्ट्रीय महामार्गावर सासवड -जेजुरी मार्गावरील भोंगळे मळा येथे पायी चालणाऱ्या वैष्णवांच्या दिंडीत वारकऱ्यांचे साहित्य वाहून नेणारा ट्रक शिरला. यामध्ये १० ते १५ वारकऱ्यांना धडक बसली असून तीन वारकरी महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर सुमारे ७ जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी घडली. जखमींवर येथील खाजगी व शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्दैवी अपघातामुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स पोस्ट करून मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर केली आहे.

   या दुर्दवी घटनेत १) नंदा पवार, वय ६०, रा. कवलापूर, ता. मिरज, जि. सांगली, २) माधवी राजाराम सालगरे, वय ५५, रा. मालगाव, ता. मिरज, जि. सांगली, ३) राजश्री शंकर भोसले, वय ५५ , रा. कसबे दिग्रज, ता. मिरज, जि. सांगली या महिलांचा मृत्यु झाला आहे. १) निवृत्ती उमाजी जगताप ,२) मंगल विलास पाटील ,३) शैलजा दिनकर जगताप ,४) नारायण महादू पडवळ५) कासाबाई शंकर गस्ते रा.आष्ठा (सांगली) ६) आक्काताई बबन कोळी ,रा.शिरगाव (सांगली ) ७) गीताबाई सदाशिव हंकारे ,रा.कसबेदिग्रज (सांगली) असे सातजण गंभीररित्या जखमी झाले आहेत.

Advertisement

Advertisement