माजलगाव दि.२९(प्रतिनिधी): तालुक्यातील तालखेड परिसरात एका व्यक्तीचा संशयास्पद मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच माजलगाव ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
मृत व्यक्तीची ओळख विकास वाघमोडे रा. किट्टीआडगाव, ता. माजलगाव अशी झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, विकास वाघमोडे यांचा मृतदेह तालखेड येथे आढळून आला. या घटनेबाबत मृताच्या नातेवाईकांनी घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला असून, घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी पंचनामा पूर्ण करून मृतदेह शवविच्छेदनासाठी माजलगाव येथील शासकीय रुग्णालयात पाठविला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
बातमी शेअर करा

