Advertisement

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनासाठी बीडमध्ये बैलगाडी मोर्चा

प्रजापत्र | Friday, 12/02/2021
बातमी शेअर करा

बीड-दिल्लीत शेतकऱ्यांचे मागील दोन महिन्यापेक्षा अधिक काळापासून कृषी कायदे मागे घेण्यासाठी आंदोलन सुरु असून या आंदोलनाला समर्थन दर्शविण्यासाठी बीडमध्ये शुक्रवारी (दि.)शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. यात मोहन गुंड,नारायण गोले पाटील, मोहन जाधव, भीमराव कुटे, राजेश ढवळे यांच्यासह शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
     केंद्र सरकारने शेतकरी हिताच्या दृष्टीने निर्णय घेण्याऐवजी त्यांचे खच्चीकरण करणे सुरु केले आहे.मोदी सरकार उद्योपतींच्या हिताचे निर्णय घेत आले असून या सरकारला शेतकऱ्यांशी देणे घेणे नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.नवीन  कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांचे जगणे अवघड होणार असून मागील दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या आंदोलनाला धडपण्यासाठी मोदी सरकार साम-दाम-दंड-भेदचा वापर करीत आहे.हे आंदोलन दडपण्यासाठी आतापर्यंत कटकरस्थाने रचण्यात आले असून आंदोलनात फूट पडण्याचा ही अनेकदा प्रयत्न करण्यात आला आहे.जोपर्यंत कृषी कायदे मागे घेण्यात येणार नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरु राहणार राहणार असून या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बीडमध्ये विराट बैल गाडी रॅली काढण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यात मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता. आंबेडकर पुतळ्यापासून या रॅलीला सुरुवात झाली.जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकला. यावेळी कृषी कायदे मागे घेण्यात यावे, स्वामीनाथन आयोग लागू करावा, इंधनाचे दर आटोक्यात आणावेत या मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले.

Advertisement

Advertisement