बीड : जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाने मोठे धक्के दिले आहेत. परळी तालुक्यात 5 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्या पाठोपाठ बीड शहरातही कोरोनाचे 3 नवे रुग्ण समोर आले आहेत. अंबोजोगाईत 3 आणि आष्टीत कोरोनाचे 2 रुग्ण आढळून आले आहेत. मंगळवारी जिल्ह्यातून 288 स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 13 पॉझिटिव्ह आले आहेत. एकाच दिवशी पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांचा हा आजपर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे.
परळीत एसबीआयच्या कर्मचार्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आल्यानंतर परळीत कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर संसर्ग झाल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी परळी तालूक्यात आणखी पाच व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर बीडमध्येही आणखी 3 रुग्ण आढळून आले आहेत. प्रशासनाने हे रुग्ण कुठले आहेत याची माहिती मात्र दिलेली नाही. अंबाजोगाईमध्ये तीन रुग्ण आढळले असून आष्टी तालुक्यातील देविनिमगाव येथे दोन रुग्ण आढळले आहेत.

	        
	         बातमी शेअर करा  
	      	    
	    
  
	    
  
	
      
                                    
                                
                                
                              