Advertisement

नीट परीक्षेची जबाबदारी इंडियन आर्मीवर?

प्रजापत्र | Thursday, 28/05/2026
बातमी शेअर करा

दिल्ली : देशभरात प्रचंड खळबळ उडवणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणाची (NEET Exam 2026 Paper Leak) व्याप्ती दिवसागणिक वाढत चालली आहे. भविष्यात असा कोणताही दगाफटका टाळण्यासाठी आणि परीक्षेची विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) आता थेट भारतीय लष्कराची (Indian Army) मदत घेण्याची तयारी सुरू केल्याची माहिती समोर येत आहे. 

   आगामी परीक्षांमध्ये प्रश्नपत्रिका फुटू नयेत यासाठी लष्कराकडे गुप्तता आणि सुरक्षेची जबाबदारी सोपवण्याबाबत सरकारकडून गंभीर विचार सुरू आहे. या संदर्भात दिल्लीत संरक्षण मंत्री (Defense Minister) राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांच्यासह अन्य महत्त्वाच्या मंत्र्यांची आणि अधिकाऱ्यांची एक उच्चस्तरीय बैठक सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  एकीकडे सरकार सुरक्षेच्या नवीन उपाययोजनांवर विचार करत असतानाच, दुसरीकडे केंद्रीय अन्वेषण ब्यूरो म्हणजेच सीबीआय (CBI) या प्रकरणाच्या मुळाशी पोहोचण्यासाठी राज्यभरात मोठ्या कारवायांचे सत्र राबवत आहे. या पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने आणखी दोघांना अटक (Arrest) केली असून, एकूण अटक आरोपींची संख्या आता १३ वर पोहोचली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणातील बारावी आणि तेरावी अटक सुद्धा महाराष्ट्रातूनच (Maharashtra) झाली आहे.

Advertisement

Advertisement