Advertisement

 धावत्या रिक्षात प्रवाशाचे दागिने लंपास

प्रजापत्र | Tuesday, 12/05/2026
बातमी शेअर करा

गेवराई दि.१२(प्रतिनिधी):  तलवाडा ते गेवराई या मार्गावर रिक्षाने प्रवास करत असलेल्या एका दांपत्याच्या बॅगेतून अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.

    गंगावाडी येथील ६६ वर्षीय शेतकरी मदन सूर्यभान बोराडे यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. फिर्यादी बोराडे यांचा मुलगा ज्ञानदेव आणि सून शिवकन्या हे ४ मे २०२६ रोजी सकाळी ८.४० ते ९.३० वाजेच्या सुमारास तलवाडा येथून गेवराईकडे अपे रिक्षाने प्रवास करत होते. प्रवासादरम्यान गर्दीचा किंवा प्रवाशांच्या गाफील राहण्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या जवळील बॅगची चैन उघडली. बॅगेत असलेल्या एका लहान पाकीटात ४ ग्रॅम ३० मिली वजनाचे सोन्याचे कानवेल   अंदाजे २१ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी भरदिवसा लंपास केला.प्रवासात दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने ११ मे रोजी पोलिसात धाव घेतली. या तक्रारीवरून तलवाडा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोह श्री.शिंदे करत आहेत.

Advertisement

Advertisement