बीड-जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून सोमवारीही (दि. ६) तीन रुग्णांची भर पडली आहे.यामध्ये जिल्ह्यात नवीन रुग्ण आढळले असून बीड शहराचे मिटर थांबले आहे. 
                                   सोमवारचे कोरोना पॉझिटिव्ह हे परळीतील एक आणि धारूरमधील एक आणि अंबाजोगाईतील एक असे आहेत.यामध्ये परळीत एसबीआयचे कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आले असून धारूरमधील मुंबईवरून आलेला १० वर्षीय मुलगा पॉझिटिव्ह आला. तर अंबाजोगाईतील शिक्षक कॉलनीमधील ४५ वर्षीय पुरुषाला देखील कोरोनाची लागण झाली आहे.सोमवारी १९७  स्वॅब  तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.यातील १८६ निगेटिव्ह आले असून ३ पॉझिटिव्ह आले आहेत.तर आठ अनिर्णित राहिले. 
 
	        
	         बातमी शेअर करा  
	      	    
	    
  
	    
  
	
      
                                    
                                
                                
                              
