बीड दि.5 (प्रतिनिधी) : बीड जिल्ह्यात कोरोनाचा आकडा सातत्याने वाढत असून रविवारी (दि.5) आणखी 6 रुग्णांची भर पडली. बीड जिल्ह्यातून 249 स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या सर्वांचा अहवाल प्राप्त झाला असून 239 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 6 अहवाल पॉझिटिव्ह आले असून हे नवे रुग्ण बीड येथील 2, अंबाजोगाई येथील 1, सुर्डी ता.आष्टी येथील 2 तर परळीयेथील 1 असे आहेत. यामुळे बीड जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 33 इतकी झाली आहे.
बीड जिल्ह्यात कोरोनाचे मीटर सातत्याने वाढत असून इतर जिल्ह्यातही बीडमधून गेलेले रुग्ण पॉझिटिव्ह आढळत आहेत. बीड जिल्ह्यातून रविवारी तब्बल 249 स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी 6 पॉझिटिव्ह आल्यामुळे आता जिल्ह्यातील रुग्णसंख्या वाढली आहे. बीड शहराच्या जुना बाजार भागातील 38 वर्षीय महिला आणि 11 वर्षीय मुलगा पॉझिटिव्ह आला आहे तर अंबाजोगाईच्या संतकबीर नगरमधील महिला पॉझिटिव्ह आहे.
दरम्यान रविवारी पहाटेच बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी परळी शहर देखील लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला तर बीड शहर मागील चार दिवसांपासून अगोदरच लॉकडाऊनमध्ये आहे. परळी शहरासह तब्बल 14 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन घोषीत करण्यात आला आहे. दरम्यान आजच्या तारखेला बीड जिल्ह्यात तब्बल 11 ठिकाणी कंटेन्मेंट झोन सुरु आहेत. जिल्ह्यातून आत्तापर्यंत 3728 व्यक्तींचे स्वॅब तपासण्यात आले आहेत.
बातमी शेअर करा