Advertisement

बीड जिल्ह्यातील ठेवीदारांचा मुंबईत आक्रोश

प्रजापत्र | Tuesday, 24/02/2026
बातमी शेअर करा

मुबई दि.२४(प्रतिनिधी) बीड जिल्ह्यातील ज्ञानराधा, साईराम, राजस्थानी, मातोश्री, माँसाहेब जिजाऊ, शुभकल्याण, छत्रपती मल्टीस्टेट आणि मराठवाडा, माजलगाव, लक्ष्मीमाता अर्बन या संस्थेतील ठेवीदारांना तात्काळ न्याय मिळावा आणि त्यांच्या ठेवी परत मिळाव्यात या मागणीसाठी प्रा.सचिन उबाळे यांच्या नेतृत्वाखाली हजारो ठेवीदारांनी मुंबईत मोर्चा काढला.लढा सर्व सामान्यांसाठी, लढाई आरपारची असे म्हणत मी ठेवीदार म्हणून प्रत्येक ठेवीदार मुंबईत ठाण मांडून बसला होता. आ. संदीप क्षीरसागर, शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत नवले, राष्ट्रवादीचे माध्यमप्रमुख भागवत तावरे यांनी मोर्चास्थळी येऊन पाठींबा दिला आणि ठेवीदारांच्या न्याय हक्काच्या लढ्यात सोबत असल्याचा विश्वास व्यक्त केला.बीड येथील ठेवीदार संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने मुंबईतील आझाद मैदानावर ठेवीदारांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन केले .  

Advertisement

Advertisement