अहिल्यानगर: राहुरी तालुक्यात एक अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर घनदाट जंगलात पाच दिवस डांबून अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास सुरु आह. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
राहुरीतील १५ वर्षांची मुलगी सकाळी कॉलेजला जाते म्हणून घराबाहेर पडली. मात्र ती संध्याकाळपर्यंत घरी परतली नाही, त्यामुळे पालकांची चिंता वाढली. त्यांनी शोधाशोध केली पण ती आढळून न आल्याने राहुरी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोदंवला आणि तपास सुरु केला. मुलीच्या शोधासाठी एक पथकही नेमले.पोलिसांनी तांत्रिक बाबींच्या आधारे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज. मोबाईल लोकेशन ट्रॅकिग, आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरु केला असता मुलीचे लोकेशन नाशिक-सुरत महामार्गालगतच्या रामशेज किल्ल्याजवळ असल्याचे आढळून आले. पोलिस किल्ल्याजवळील घनदाट जंगलात पोहोचले मुलीची सुटका केली.सुटकेनंतर पीडितेने पोलिसांना आपबीती सांगितली. मुक्तार हैदर पठाण (मुख्य आरोपी), कौसर हैदर पठाण आणि आकाश शरद संसारे या तिघांनी तिला पाच दिवस या घनदाट जंगलात डांबून ठेवले अन् तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला, अशी माहिती तिने पोलिसांना दिलेल्या जबाबात दिली. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली. त्यांच्याविरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरु आहे.

