Advertisement

शिवरस्त्याच्या वादावरून शेतकऱ्याला बेदम मारहाण

प्रजापत्र | Friday, 23/01/2026
बातमी शेअर करा

गेवराई दि.२३ (प्रतिनिधी):तालुक्यातील ढालेगाव येथील एका शेतकऱ्याला शिवरस्त्यावरून ये-जा करण्याच्या कारणावरून १५ ते १६ जणांनी  त्याच्यासह  मुलाला बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली असून. या प्रकरणी१६ जणांविरूध्द तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

       गेवराई तालुक्यातील ढालेगाव येथील आसाराम आण्णा तौर (वय ६३) आणि देशमुखवाडी वस्ती येथील आसाराम भानुदास पारेकर यांच्यात मागील काही काळापासून वाद सुरू आहे. आसाराम पारेकर हे शिवरस्त्यावरून ये-जा करू देत नसल्याच्या कारणावरून दि.१५ जानेवारी रोजी रामपुरी शिवारातील शेतात ऊसतोडणी सुरू होती. ऊसाचे ट्रॅक्टर शिवरस्त्यावरून नेण्याच्या तयारीत असतांना आसाराम पारेकर व इतरांनी रस्ता निट करण्याच्या कारणावरून शिवीगाळ केली व थोड्यावेळाने आपल्या नातेवाईकांना बोलावून घेतले. आसाराम पारेकर यांचा मुलगा अमोल पारेकर हा तलवार घेऊन त्या ठिकाणी आला,त्याच्यासोबत इतरही १५ ते १६ जण होते. त्यांच्याही हातात काठ्या, लोखंडी रॉड होते. काठ्या व लोखंडी रॉडने माझ्यासह माझ्या मुलांना मारहाण करून तुला तलवारीनेच कापून टाकतो अशी धमकी अमोल पारेकर याने दिली. या मारहाणीत मला व माझे मुलं जखमी झाली आहेत असा जबाब आसाराम तौर यांनी दिला. या प्रकरणी तौर यांच्या फिर्यादीवरून आसाराम भानुदास पारेकर, मारूती महादेव पारेकर, अमोल आसाराम पारेकर, संतोष आसाराम पारेकर, बाळू आसाराम पारेकर, महादेव भानुदास पारेकर, बाळू नारायण सुरनर, दत्ता रामभाऊ कोळेकर, लहु कोळेकर, बबन शिवाजी काळे, बाळू दिगंबर काळे, सर्जेराव शिवाजी काळे, बिरूबा लक्ष्मण होणमाने, लक्ष्मण होणमाने, भागवत बाबासाहेब धायगुडे, भारत संपत धायगुडे या १६ जणांविरूध्द तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Advertisement

Advertisement