धाराशिव : राज्याच्या राजकारण महापालिका निवडणुकानंतर (Election) आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये नाट्यमय घडामोडी घडत आहेत. त्यामुळे, कुठे युती तर कुठे स्वबळाचा नारा देत निवडणुक लढल्या जात असल्याचं चित्र आहे. जिल्हा परिषद निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायचा आज शेवटचा दिवस असल्याने पक्षांतर अन् अचानक एबी फॉर्मसह उमदेवार पाहायला मिळत आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून भाजपात (BJP) प्रवेश करणार असल्याची चर्चा असलेल्या शिवाजी सावंत यांचा भाजप प्रवेश न होताच त्यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे, तानाजी सावंत यांना हा मोठा धक्का मानला जातो.
शिवसेना नेते तथा आ.शिवाजीराव सावंतांच्या छातीवर अखेर कमळ लागलं असून जिल्हा परिषद निवडणुकांसाठी पुत्र पृथ्वीराज सावंतांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे, गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या शिवाजी सावंत यांचा भाजप प्रवेश रखडला असला तरीही त्यांना ऐनवेळी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी भाजपकडून तिकीट देण्यात आलं आहे.

