Advertisement

ई केवायसी न झाल्याने हफ्ता न मिळाला नाही?

प्रजापत्र | Wednesday, 21/01/2026
बातमी शेअर करा

मुंबई : लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना ई केवायसी न केल्यानं गेल्या महिन्यात हफ्ता मिळू शकलेला नाही. आता त्यासंदर्भात राज्य सरकारकडून प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ई केवायसी करताना काही कारणास्तव चुका झाल्या आहेत अशा ठिकाणी पडताळणी करावी. अंगणवाडी सेविकांमार्फत ही पडताळणी प्रत्यक्ष करण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत.

       लाडकी बहीण योजनेसाठी ई केवायसी करण्यासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदत दिली गेली होती. मात्र अनेक लाभार्थ्यांकडून ई केवायसीचा चुकीचा पर्याय निवडला गेल्यानं अडचण निर्माण झाली होती. त्या लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेचा हफ्ताही मिळालेला नाही.डिसेंबरचा हफ्ता न मिळाल्याच्या अनेक तक्रारी राज्य सरकारकडे आल्या. या तक्रारींची दखल घेत राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून प्रत्यक्ष पडताळणी करावी असं आदिती तटकरेंनी म्हटलंय.

आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावरून याबाबत माहिती देताना म्हटलं की, महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी, त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी पर्यंत e-KYC करण्याची मुदत देण्यात आली होती.काही कारणास्तव e-KYC करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे. म्हणूनच, योजनेच्या निकषांनुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी (Physical Verification) करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचंही मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं.

Advertisement

Advertisement