दिल्ली :जागतिक राजकारणातील अनिश्चितता आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रमक भूमिकेमुळे कमोडिटी बाजारात आज मोठा भूकंप झाला आहे. सोमवारी वायदा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतींनी सर्व विक्रम मोडीत काढले. सोन्याने १,४५,५०० रुपये प्रति १० ग्रॅमचा टप्पा ओलांडला असून चांदीने चक्क ३ लाखांचा ऐतिहासिक टप्पा पार केला आहे.
सोमवारी व्यवहार सुरू होताच 'एमसीएक्स'वर सोन्याच्या फेब्रुवारी फ्युचर्समध्ये तब्बल ३,००० रुपयांची (२% पेक्षा जास्त) वाढ झाली. सोन्याने १,४५,५०० रुपये प्रति १० ग्रॅमचा नवा उच्चांक गाठला. दुसरीकडे, चांदीमध्ये सर्वाधिक तेजी दिसून आली. मार्च फ्युचर्समध्ये चांदी तब्बल १३,५५० रुपयांनी (५%) वधारून ३,०१,३१५ रुपये प्रति किलो या विक्रमी स्तरावर पोहोचली.
प्रमुख महानगरांतील आजचे सोन्याचे दर (प्रति १ ग्रॅम)
शहर २४ कॅरेट (₹) २२ कॅरेट (₹) १८ कॅरेट (₹)
मुंबई/पुणे १४,५६९ १३,३५५ १०,९२७
दिल्ली १४,५८४ १३,३७० १०,९४२
कोलकाता १४,५६९ १३,३५५ १०,९२७
बेंगळुरू १४,५६९ १३,३५५ १०,९२७
चेन्नई १४,६७३ १३,४५० ११,२३०
जागतिक बाजारातील कल
सोमवारी जागतिक बाजारपेठेतही सोन्याचे भाव १% पेक्षा जास्त वधारले. जागतिक स्तरावर सोन्याने ४,६६० डॉलर प्रति औंसचा टप्पा पार करून नवा रेकॉर्ड केला आहे. ट्रम्प यांच्या नवीन व्यापार धोरणांमुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहण्याचा ओघ वाढला आहे.

