बीड दि.१७ (प्रतिनिधी): येथील इन्कम टॅक्स कर्मचाऱ्याचा मृतदेह एका चारचाकी वाहनात कपीलधार रस्त्यावर कमानी जवळ आढळल्याने खळबळ उडाली आहे. घटनास्थळी बीड ग्रामीण पोलीस आणि फॉरेन्सिक पथक दाखल झाले आहे.
सचिन नारायण जाधवर (वय ४५) असे त्या मयत कर्मचाऱ्याचे नाव असून कालपासून ते गायब होते. रात्री घरी ही परतले नसल्याने आज सकाळी त्यांच्या पत्नीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. आज दुपारी १ च्या सुमारास कपीलधार रस्त्यावरील देवस्थानच्या कमानी जवळ एका चारचाकी वाहनात मृतदेह आढळला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. यानंतर हा प्रकार नेमका काय ? हे समोर येणार आहे.
बातमी शेअर करा

