सोलापूर: सोलापुरातील मोहोळ तालुक्यात टेम्पोने धडक (Solapur Accident News) दिल्यामुळे दोन जिवलग मैत्रिणींना जीव गमवावा लागला आहे. मोहोळ तालुक्यातील पिंपरी गावाजवळील ही संतापजनक घटनी घडली आहे. अकरावीत शिकणारी प्रज्ञा धनाजी कोकाटे आणि तिची मैत्रीण बारावीत शिकणारी स्नेहल काशिनाथ वाघमोडे अशा अपघातात मृत्यू झालेल्या मुलींची नावे आहेत.(Accident News)
प्रज्ञा ही स्कुटीवरून स्नेहलला घेऊन मोहोळवरून कुरुल गावाला जात असताना समोरून येणाऱ्या टेम्पोने जोरदार धडक दिली. यावेळी झालेल्या भीषण अपघातात जीवलग मैत्रिणींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे. या धडकेत प्रज्ञा जागीच ठार झाली तर स्नेहल धडकेत गंभीर जखमी झाल्यामुळे तिला सोलापुरातील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. प्रज्ञा ही अकरावीत नेताजी महाविद्यालयात शिकत होती तर स्नेहल ही राष्ट्रमाता इंदिरा कन्या महाविद्यालयात शिकत होती.

