बीड दि.२६ (प्रतिनिधी): शहरातील (Beed)बसस्थानक व जिल्हा रुग्णालय परिसरात सातत्याने मोबाईल चोरी, जबरी चोरी, नागरिकांना अडवून बळजबरी पैसे काढून घेणे,मारहाण तसेच खून प्रयत्नासारख्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या सराईत आरोपीस बीड शहरच्या डीबी पथकाने अटक करून त्याच्याकडून मुद्देमाल जप्त केला आहे.
आरोपी दीपक संतोष भोरे, रा. खडकपुरा पेठ, बीड (Beed)सदरील आरोपीवर यापूर्वीही खून, मारामारी, जबरी चोरी व चोरी अशा विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपी हा विशेषतः मोबाईल चोरीत सराईत गुन्हेगार असून तो बसस्थानक,जिल्हा रुग्णालय सारख्या गर्दीच्या ठिकाणी नागरिकांची गर्दी पाहून गुन्हे करत असल्याचे निष्पन्न झाले आहे.गुन्हे करून हा आरोपी नाशिक येथे पळून जाऊन तेथे वास्तव्य करत होता. गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे बीड शहर पोलीसठाण्याच्या डीबी पथकाने त्याचा माग काढून शिताफीने अटक (Crime)करून त्याच्याकडून मुद्देमाल जप्त केला आहे. सदरील कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर व उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ,पोलीस उपनिरीक्षक महेश जाधव, पोलीस हेडकॉन्स्टेबल संदीप आघाव, मनोज जायभाये,गहिनीनाथ बावनकर, इलियास शेख, राम पवार व मंगेश शिंदे यांनी केली.

बातमी शेअर करा
