चकलंबा दि.२३(वार्ताहर):शिरूर कासार तालुक्यातील वडाचीवाडी शिवारातील विहरीवरील सोलार पंप अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना गुरुवार (दि.११) रोजी घडली असून एकूण १,१०,००० रुपयांचा ऐवज लंपास केल्याप्रकरणी चकलंबा पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हाभरात दिवसेंदिवस चोरीच्या घटनेत वाढ होत असून शिरूर कासार तालुक्यातील वडाचीवाडी येथील उद्धव प्रल्हाद नागरगोजे (वय ४०) यांच्या शेतातील विहरीवरील जीके कंपनीच्या ७ सोलार पेल्टा, ५ एचपी पाणबुडी मोटर पंप,४ एम एम केबल,असा एकूण १,१०,००० रुपयांचा ऐवज लंपास नेल्याची घटना गुरुवार (दि.११) रोजी रात्री घडली असून अज्ञात चोरट्यांविरुद्ध चकलंबा पोलीस ठाण्यात उद्धव नागरगोजे यांच्या फिर्यादीवरून सोमवार (दि.२२) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरील घटनेचा पुढील तपास श्री.केदार हे करत आहेत.

बातमी शेअर करा
