शिरुर कासार दि.२३(प्रतिनिधी):शहरातील संभाजी महाराज चौकातील सेतू केंद्राचे दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची घटना रविवार (दि.२१) रोजी रात्री घडली असून ३०,००० हजारांचा ऐवज लंपास केल्याप्रकरणी शिरुर कासार पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
मागील काही दिवसांपासून शिरुर शहरात चोरीच्या घटनेत दिवसेंदिवस वाढत होताना दिसत आहे.किशोर शिवाजी मावसकर (वय ३३) रा. शिरुर कासार यांना शहरातील संभाजी महाराज चौकात,जुने पोलीस ठाण्याच्या समोर सोमवार (दि.२२) रोजी सेतू केंद्राचे उदघाटन करायचे होते परंतु अज्ञात चोरट्यांनी रविवार (दि.२१) रोजी रात्री दुकान फोडून त्यातील दोन कॉम्प्युटर, दोन प्रिंटर, लाईटचे बोर्ड असा एकूण ३०,००० हजारांचा ऐवज लंपास केला असून किशोर मावसकर यांच्या फिर्यादीवरून सोमवार (दि.२२) रोजी शिरुर कासार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास श्री.नागरे हे करत आहेत.

