बीड: मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात अखेर बीडच्या विशेष मकोका न्यायालयात मंगळवारी दोषारोप निश्चित करण्यात आले. आता पुढील सुनावणी ८ जानेवारीला होणार आहे
मागच्या अनेक तारखांना वेगवेगळ्या कारणांनी दोषारोप निश्चिती लांबली होती. या प्रकरणात वाल्मिक कराडसह इतर आरोपींवर हत्या, खंडणी, अपहरण आदी गुन्ह्यांसोबतच मकोका कायद्याखाली दोषारोप पत्र विशेष मकोका न्या. पी व्ही पटवदकर यांच्यासमोर दाखल आहे.
मंगळवारी (दि.२३) न्यायालयाचे कामकाज सुरू होताच आरोपींच्या वकिलांकडून पुन्हा लॅपटॉप चा मुद्दा उपस्थित केला गेला. मात्र न्यायालयाने दोषारोप निश्चितीचा निर्णय घेत यातील आरोप वाल्मीक कराड ,विष्णू चाटे ,सुदर्शन घुले ,प्रतीक घुले ,सुधीर सांगळे ,महेश केदार ,जयराम चाटे
यांच्यासह फरार आरोपी कृष्णा आंधळे याच्या विरोधात खंडणी, अपहरण, हत्या, पुरावे नष्ट करणे,कट कारस्थान, संघटितपणे गुन्हेगारी कारवाई करणे आणि जातीवाचक शिवीगाळ अशा विविध कलमाखाली दोषारोप निश्चित केले आहेत. यात पुढील सुनावणी ८ जानेवारी रोजी होणार आहे

बातमी शेअर करा
