अंबाजोगाई दि. २१ (प्रतिनिधी): अंबाजोगाई नगरपालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाली असून या निवडणुकीत ‘'पापा मोदी’ गटाला मोठा धक्का बसला आहे. भाजप पुरस्कृत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नंदकिशोर मुंदडा यांनी तब्बल २५१० मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे.
नगराध्यक्ष पदासोबतच नगरसेवक पदासाठी लढविण्यात आलेले भाजप पुरस्कृत पॅनलही बहुमताने विजयी झाले असून अंबाजोगाई नगरपालिकेवर भाजप पुरस्कृत नेतृत्वाची स्पष्ट पकड निर्माण झाली आहे.
या विजयानंतर शहरातील रमाबाई चौकात भाजप समर्थक व कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. फटाके फोडून, एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त करण्यात आला. या निकालामुळे अंबाजोगाईच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल झाला असल्याचे ,मत व्यक्त केले जात आहे
बातमी शेअर करा

