बीड दि.२४ (प्रतिनिधी)-मागील सहा वर्षांपासून(Beed) अनेक गंभीर गुन्हे दाखल असून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीला अखेर डीवायएसपी पूजा पवार यांच्या पथकाने अटक केली आहे.
कविराज उर्फ बंटी राजकुमार जाधव (रा.घोडका राजुरी) असे आरोपीचे नाव आहे.कविराजवर पिंपळनेर (Police)पोलीस ठाण्यात अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.मागील सहा वर्षांपासून पोलिसांना तो गुंगारा देत होता.बीडमधील एका हॉटेलमध्ये तो आल्याची माहिती मिळताच डीवायएसपी पूजा पवार यांच्या टीमने छापा मारून आरोपीला पहाटे ३ च्या सुमारास ताब्यात घेतले.दरम्यान पिंपळनेर(Police) पोलिसांकडे आरोपी स्वाधीन करण्यात आला असून ही कारवाई पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत,अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर,पोलीस उपाधीक्षक पूजा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय काटकर,सचिन आगलावे,श्री.राऊत यांनी केली.
बातमी शेअर करा

