बीड-येथील डीवायएसपी पूजा पवार यांनी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हवाला रॅकेटवर कारवाई करत तब्बल सतरा लाखांची रोकड ताब्यात घेतली आहे. बीड शहरात निवडणुकीच्या कालावधीमध्ये पूजा पवार यांनी ही मोठी कारवाई केल्याने शहरात याच्या मोठया प्रमाणावर चर्चा सुरु झाल्या आहेत.
मसरत नगरमधील एका अपार्टमेंटमध्ये पैशांचा बाजार भरवून हवाला सुरु असल्याची माहिती डीवायएसपी पूजा पवार यांना मिळाली होती. त्यानुसार सायंकाळी त्यांच्या टीम ने छापा मारला असता घरात १७ लाखांची रोकड आढळून आली आहे. यावेळी पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले असून सध्या शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे कळते. सदर कारवाई पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक पूजा पवार, एपीआय पुजारी, सचिन आगलावे, मनिषा केदार यांनी केली आहे.

बातमी शेअर करा
