किल्लेधारूर दि.१७(प्रतिनिधी)-तालुक्यातील आंबेवडगाव येथे रविवारच्या रात्री उशिरा अज्ञात चोरट्याने दोन घरे फोडून १५ तोळे सोने व ५० हजारांपेक्षा जास्त रोकड लंपास केल्याची घटना समोर आली आहे.चोरीच्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.याप्रकरणी धारूर पोलीस स्टेशनमध्ये रितसर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे व धारूर पोलीस पुढील तपास करत आहे.
तालुक्यातील आंबेवडगाव येथील माणिक तुळशीराम घोळवे व मोकिंदा धर्मराज घोळवे यांच्या दोघांच्या घरी रविवार दि. १६ रोजी रात्री उशीरा लाईटमध्ये बिघाड करून अंदाजे पावणे दोनच्या सुमारास माणिक तुळशीराम घोळवे यांचे मेन लोखंडी गेटचे कुलूप तोडले व समोरच्या दोन्ही घरात घरचे झोपलेले पाहून बाहेरून कड्या लावून टाकल्या व मागच्या दोन्ही रूम उघडून कपाटातील सर्व साड्या अस्ताव्यस्त करून कपाटातील ६ ते ७ तोळे सोने व ५०, हजार नगदी रोकड घेऊन चोरटे पसार झाले. मोकिंदा घोळवे यांच्या मेन गेटचे कुलूप तोंडून सुधीर घोळवे वरच्या मजल्यावर व मोकिंदा घोळवे हे खालच्या मजल्यावर पुढच्या रूम मध्ये झोपलेला पाहून मागच्या घरातील कपाट पेट्या, सुटकेस उघडून एक संदूक घेऊन मोडत असताना आवाज आला पंचफुला घोळवे जाग्या झाल्या आणि ओरडल्या.तोपर्यंत संदूक घेऊन चोरटे पळाले. सगळा गोंधळ ऐकून कांताराम घोळवे, शांताबाई घोळवे यांनी मोठ मोठ्यांनी ओरडून आख्खी गल्ली गोळा केली. त्या नंतर माणिक तुळशीराम घोळवे यांचा घरातून आवाज येत होता आमचेदार बाहेरून लावलेले आहे,उघडा.त्यानंतर दार उघडले गेले सर्व बाजूनी गावकरी यांनी सर्वांनी शोध घेतला तो पर्यंत चोर फरार झाले. दरम्यान एवढेच नव्हे तर एक मोटार सायकल धारूरकडून तेलगावकडे गेल्याचे सांगण्यात आले.दरम्यान रात्री पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली व पाहणी केली असून फिंगर, व श्वान पथक बोलवण्यात आले आहे, पुढील तपास पोलीस करत आहेत.

बातमी शेअर करा
