Advertisement

डॉ. योगेश क्षीरसागर अखेर भाजपात

प्रजापत्र | Sunday, 16/11/2025
बातमी शेअर करा

बीड: अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस कडून विधानसभा लढविलेले पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ. योगेश क्षीरसागर यांनी अखेर भाजपात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत डॉ. योगेश आणि डॉ. सारिका क्षीरसागर यांनी भाजपात प्रवेश केला. यामुळे आता बीड शहरात भाजपचा प्रभाव वाढणार आहे
नगरपालिका निवडणूकीच्या तोंडावर राष्ट्रवादी मधील गटबाजीला वैतागून काल डॉ. योगेश क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी आता भाजपात प्रवेश केला आहे.

Advertisement

Advertisement